१ ते ३ एप्रिल २०२३, सागर पार्क, जळगाव
+91 9370077311
व्यक्ती कुणीही असो, जगण्याचा संघर्ष ओघानं आलाच... या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी, माणसाला तगण्यातून जगण्याकडे’ नेण्यासाठी मदतीचा हात हा आवश्यक असतो. सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना।’ या उक्तीनुसार समाजातील उपेक्षीत, तळागाळातील वंचितांच्या उत्कर्षासाठी आपल्या भोवतालच्या विविध संस्था निस्पृह भावनेने अपार कष्ट करीत असतात. त्या संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम हेल्प-फेअरच्या माध्यमातून मागील ४ वर्षांपासून होत आहे. . माणसाच्या आर्थिक, मानसिक जडण घडणीच्या दृष्टीने उचललेले हे दमदार पाऊल होय.
हेल्प-फेअर - ५ हा उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी, वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक उपक्रम १ ते ३ एप्रिल २०२३ दरम्यान शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजला आहे. यामध्ये समाजोत्थानासाठी आत्मियतेने मदतीचे कार्य करणार्या व्यक्ती, समाजिक संस्था, एनजीओ, क़ॉर्पोरेटस् आणि सहकारी संस्था यांच्या कार्याचा जवळून परिचय होईल. व्यक्तिच्या समृद्दीसाठी अखंड वाटचाल करणार्या सेवाभावी संस्था, दानशूर दाते’ आणि मदतीची अपेक्षा बाळगणारे याचक’ यांना परस्पर पूरक ठरणारे, महत्त्वाचे दुवा जोडण्याचे काम या फेअरच्या माध्यमातून प्रभावीपणे होईत यात तीळमात्र शंका नाही. त्याचबरोबर विविध हॉबी स्टॉल्स आपल्या हॉबी फेअर मध्ये याच ठिकाणी बघायला मिळतील. तसेच महानगरपालिकेतील ५ उत्तम काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा "स्वच्छता दूत" गौरव ही केला जाईल. हेल्प फेअर - ५ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल खाद्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !
समाजातील गरीब व होतकरू लोकांसाठी झटणा-या प्रस्थापीत संस्था व त्यांचे कार्य समाजापूढे आणणे, प्रकाशझोतामध्ये आणणे याच सोबत SOCIAL ENTREPRENEURSHIP अंतर्गत युवा पीढी तर्फे सुरू झालेले नवे प्रकल्प समाजापूढे आणणे.
समाजातील उच्च स्तरातील घटकांना विशेष आमंत्रित करून त्यांना सेवाभावी संस्थाच्या कार्याची विस्तृत माहिती करुन देणे, त्याची निकड पटवून देणे जेणेकरून ते प्रकल्पाशी जूडतील व समाज ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त होतील.
कॉर्पोरेट्स तर्फे देण्यात येणारी मदत तसेच शासकीय मदत इत्यादींची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचवीणे. समाजातील गरजू गरीब घटकांना देखील आमंत्रित करून त्यांना हव्या असलेल्या मदतीसाठी पर्याय उपलब्ध करून देणे.
Anand : +91 9370077311 helpfair@malhar.org