१ ते ३ एप्रिल २०२३, सागर पार्क, जळगाव
+91 9370077311
व्यक्ती कुणीही असो, जगण्याचा संघर्ष ओघानं आलाच... या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी, माणसाला तगण्यातून जगण्याकडे’ नेण्यासाठी मदतीचा हात हा आवश्यक असतो. सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना।’ या उक्तीनुसार समाजातील उपेक्षीत, तळागाळातील वंचितांच्या उत्कर्षासाठी आपल्या भोवतालच्या विविध संस्था निस्पृह भावनेने अपार कष्ट करीत असतात. त्या संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम हेल्प-फेअरच्या माध्यमातून मागील ४ वर्षांपासून होत आहे. . माणसाच्या आर्थिक, मानसिक जडण घडणीच्या दृष्टीने उचललेले हे दमदार पाऊल होय.
हेल्प-फेअर हा उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी, वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक उपक्रम दरवर्षी जळगाव शहरातील बॅरिस्टर निकम चौक येथील सागर पार्क येथे आयोजित केला जात असतो. यामध्ये समाजोत्थानासाठी आत्मियतेने मदतीचे कार्य करणार्या व्यक्ती, समाजिक संस्था, एनजीओ, क़ॉर्पोरेटस् आणि सहकारी संस्था यांच्या कार्याचा जवळून परिचय होतो. व्यक्तिच्या समृद्दीसाठी अखंड वाटचाल करणार्या सेवाभावी संस्था, दानशूर दाते’ आणि मदतीची अपेक्षा बाळगणारे याचक’ यांना परस्पर पूरक ठरणारे, महत्त्वाचे दुवा जोडण्याचे काम या फेअरच्या माध्यमातून प्रभावीपणे होतंय यात तीळमात्र शंका नाही.
"दाते" आणि "याचक" एकाच छताखाली एकाच व्यासपीठावर मल्हारच्या माध्यमातून पाचव्यांदा ...
माहितीचा स्फोट झालेल्या या युगात आपल्या शहरात आयत्यावेळी अमूक एका नेमक्या कामासाठी नेमकी कुणाकडे मदत मिळू शकेल हेच मुळी कुणाला ठाऊक नसते. म्हणजे तातडीच्या आरोग्य मदतीसाठी 108’ वर डायल करून ऍम्ब्युलन्स रुग्णापर्यंत पोहोचते आणि तात्काळ मदत मिळाल्याने अमूल्य असा जीव वाचतो. ही बाब आज ही अनेकांना माहीत नसते. अशा विविधानेक प्रकारच्या मदतीबाबत समग्र माहिती हेल्प फेअरव्दारे जनसामान्यांपर्यंत व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा सामाजिक प्रयत्न असतो. खरे तर पैशा अडक्याच्या मदतीबरोबर वेळेत मिळालेली मदत देखील खूप मोलाची ठरून जाते. ती मदत कशी मिळेल हे सगळे यातून कळणार हे इथे सांगितले जाते.
रंजल्या, गांजलेल्यांच्या बद्दल मनात असीम कारुण्य, ममत्व भाव ठेवून सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने मल्हार कम्युनिकेशन्स हेल्प फेअर ही संकल्पना घेऊन येतात. हेल्प फेअर मदत घेणार्यांसाठी आणि मदत देणार्यांसाठी मोठे ‘मदतगार’ ठरते यात शंकाच नाही. हो पणं हा जगन्नाथाचा रथ आपला हातभार लागल्याशिवाय पुढे कसा जाऊ शकेल. या सामाजिक उपक्रमासाठी आपला सक्रिय सहभाग आम्हाला आवश्यक आहे.