१ ते ३ एप्रिल २०२३, सागर पार्क, जळगाव
+91 9370077311
समाजातील गरीब व होतकरू लोकांसाठी झटणा-या प्रस्थापीत संस्था व त्यांचे कार्य समाजापूढे आणणे, प्रकाशझोतामध्ये आणणे याच सोबत SOCIAL ENTREPRENEURSHIP अंतर्गत युवा पीढी तर्फे सुरू झालेले नवे प्रकल्प समाजापूढे आणणे.
समाजातील उच्च स्तरातील घटकांना विशेष आमंत्रित करून त्यांना सेवाभावी संस्थाच्या कार्याची विस्तृत माहिती करुन देणे, त्याची निकड पटवून देणे जेणेकरून ते प्रकल्पाशी जूडतील व समाज ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त होतील.
कॉर्पोरेट्स तर्फे देण्यात येणारी मदत तसेच शासकीय मदत इत्यादींची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचवीणे. समाजातील गरजू गरीब घटकांना देखील आमंत्रित करून त्यांना हव्या असलेल्या मदतीसाठी पर्याय उपलब्ध करून देणे.