मृत्यूनंतर देहदान केल्यास त्याचा उपयोग वैद्यकीय अभ्यासासाठी होतो. या सोबतच जर मृत्यूनंतर 6 तासांच्या आत मृतव्यक्तिचे डोळे व त्वचेचे दान केल्यास ते इतरांना उपयुक्त ठरू शकते.
देहदानासाठीचा संकल्प आपण आधी करू शकता. राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात यासंबंधीचे फॉर्म उपलब्ध आहेत. जळगाव जिल्ह्रासाठी गोदावरी हॉस्पिटल व डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला देहदान स्वीकारले जाते.
दरध्वनी -
मृत्यूनंतर नेत्रदान केले जाते. तशी त्या व्यक्तिने आधी इच्छा व्यक्त केलेली असावी किंवा नेत्रदानाचा संकल्प केला असावा.जळगाव जिल्ह्रासाठी मांगिलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयात ही सुविधा आहे.ययेथे आयबँक असून गरजू अंध
व्यक्तिचे नेत्ररोपणही केले जाते.
दूरध्वनी - 0257-2217069
या बद्दलची सुविधा जळगाव जिल्ह्रात अद्याप सुरु झालेली नाही. जिवंतपणी अवयव दान फक्त कुटुंबातल्या कुटुंबातच करता येते. यात आपल्या जवळच्या नातेवाईकांना किडनी किंवा यकृत दान करु शकता.
त्वचादानासाठी मृत्यूनंतर अवघ्या 6 तासात त्वचा काढावी लागते. स्कीन बँकेशी संपर्क करून त्वचादान करता येते. सदरची प्रक्रीया नॅशनल बर्न सेंटर ऐरोली येथे होते.
दूरध्वनी - 27793333
जी व्याक्ति प्रदीर्घ काळापासून ब्रोनडेड असल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्या व्यक्तिच्या नातेवाईकांनी संमती दिल्यास ब्रोनडेड व्यक्तिचे अवयव दान करता येतात. यासाठी www.ztccmumbai.org या वेबसाईटवर संपर्क करता योईल.