मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

रतनलाल सी. बाफना फाऊंडेशन ट्रस्ट, जळगाव


भारतभरात ज्यांनी जळगावचं नांव सोन्या-चांदीच्या व्यापाराद्वारे स्वर्णतीर्थ म्हणून नावारुपास आणले त्या रतनलाल सी बाफना यांनी समाजाप्रति आपले असलेले दायित्व निभावण्याच्या हेतूने तसेच सुसंस्कृत समाज घडावा यासाठी 1987 मध्ये रतनलाल सी बाफना चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्ट मार्फत समाजातील दुर्बल घटकांना तसेच गरजुंना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी विविध उपक्रम ही राबविले जातात.

  • नेत्रपेढी

समाजातील गरजू व गरीब नेत्ररुग्णांवर अल्पदरात उपचार ,शस्त्रक्रिया तसेच नेत्ररोपणची सुविधाही मांगिलालजी बाफना नेत्रपेढीच्या माध्यमातून दिली जाते. या नेत्रपेढीच्या स्थापना व संचालनात केशव स्मृति प्रतिष्ठानचे सहकार्य मिळत आहे

  • झुणका भाकर केंद्र

गरजू व्यÏक्तना अल्प दरात नाश्ता व जेवण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने या झुणका भाकर केंद्राची स्थापना झाली. या केंद्रामार्फत जिल्हा रुणालयातही सेवा पुरवली त्याचा लाभ दररोज शेकडो लोक घेतात. या केंद्राचे व्यवस्थापन केशव स्मृति प्रतिष्ठान मार्फत होते.

  • जलमंदीर (पाणपोई)

शहरातील मुख्य अशा 3 मार्गांवर बाफना चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जलमंदिरांची(पाणपोई) उभारणी करण्यात आली आहे.शहरातील कष्टकरी, कामगार तसेच बाहेरगावाहून आलेल्यां प्रवाशांची तहान शमविण्यासाठी शुध्द पेयजलाचा पुरवठा या जलमंदिरांमार्फत केला जातो.

  • वैद्यकीय मदत

समाजातल्या तळागाळातील ज्या रुग्णांना पैशाअभावी उपचार घेणे अशक्य असते अशा रुग्णांना वैद्यकीय मदत या ट्रस्टमार्फत होते.

  • शाकाहार - सदाचार

अहिंसा धर्माचा एक भाग म्हणजेच प्राणिहिंसा टाळणे मांसाहाराचा त्याग करणे. शाकाहाराच्या प्रसारासाठी ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. स्वत: रतनलालजी बाफना हे या प्रसारासाठी व्याख्याने देतात. त्यांना या कार्यासाठी पुरस्कारही प्राप्त झाला आहे. समाजातील अनिष्ठ अशा प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात, सदाचार वाढावा यासाठी कार्य केले जाते. रतनलाल बाफना चॅरिटेबल ट्रस्टमार्फत या पूर्वी विविध समाजोपयोगी कामे केली गेली. त्यात अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप, गरजू महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मदत,आपत्तीग्रस्तांना मदत, योग प्रसारासाठी मदत . इ.

  • गो- शाळा, अनुसंधान केंद्र - (अहिंसा तीर्थ)

रतनलाल सी बाफना ट्रस्टचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कुसुंबा येथ्ील गोशाळा . अहिंसा तीर्थ म्हणून ते पर्यटन स्थळाच्या रुपाने प्रसिध्द झाले आहे. या ठिकाणी गो पालन, गो रक्षण ,संवंर्धन होते. या सोबतच भटक्या, आजारी, वृध्द, भाकड,दुर्बल अशा सर्व प्रकारच्या गायींची देखभाल , औषधोपचार, केले जातात त्यांचा सांभाळ केला जातो ज्यांना आपल्या गायी सांभाळणे. शक्य नसते त्यांच्या गायी ते येथे आणून सोडतात. येथ्ील वातावरण निसर्गरम्य असून ते जळगावकरांसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून विकसीत झाले आहे.

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.